पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

★माणूसकीच्या शोधात★

लेखन : ओंकार जगदेव वाडकर ★ माणुसकी म्हणजे नेमकं काय....??          आपण जन्मलो पण तेव्हा आपण कोण आहोत आणि आपल्या आजू बाजूला कोण आहे याचं काहीच भान आपल्याला नव्हतं. हळूहळू आपण मोठे झालो चालू लागलो बागडू लागलो, खेळू लागलो,रांगू लागलो घरच्यांचं बघून आपल्याला थोड्या फार प्रमाणात हालचाली कळायला लागल्या. पुढे आपण हे करु शकतो आपल्याला कुणी बोललं तर कुणी तरी आपली बाजू घेईल हा देखील अंदाज यायला लागला. कालांतराने आपण एक माणूस आहोत हे समजू लागले आत्ता मात्र माणूस म्हटलं तर थोडी फार माणूसकी आपल्याकडे असायलाच हवी ना.             माणूसकीची पहिली पायरी सुरू होते ती आपल्या घरच्यांनी आपल्या आई वडिलांनी आपल्या संगोपनासाठी वाड- वाढीसाठी निःस्वार्थी पणाने केलेले प्रयत्न, अहोरात्र झालेली मेहनत, यात सुध्दा माणूसकी असते ना.. यात ही प्रेम आहे..!! थोडक्यात काय तर, “ माणूस म्हणून जगताना आपल्या अंगात कुणाविषयी तरी असणारा मदतीचा निःस्वार्थी ठेवा जो चिरकाल टिकणारा असावा ती म्हणजे माणुसकी... "             एक प्रवास जगण्याचा अधिकार दे...

★ प्रवास कवितांचा

 ★ शिर्षक : माझे प्रितगंधा.... प्रित ही वेडी जडली तुझ्यावरी माझेच मला कळले नाही.... प्राशीले नयनातून सुधा  मरणाचे भय उरले नाही.... कळवळा स्वप्नातला असा की जणू मी आठवणीतला उतारू.... भासले आलिंगन तुझ्या सवेत मधूर चाखण्या स्थिरावलेले पाखरू.... बघ क्षितिजाकडे रवी अस्तास चालला   दिशा ही आतुरल्या स्वागतास शशीच्या.... तिमिरात साथीला ज्योत तेवेल प्रेमाची  कुरवाळत हळूवार स्पंदनांना उशीच्या.... भाळी तुझ्या गोंदण माझी व्हावी  तू रूप मोहिनी तूच निशिगंधा.... आगळ्या प्रितीची वेगळीच आशा मी बनलो तुझ्यासाठी माझे प्रितगंधा...              स्वरचित : ओंकार जगदेव वाडकर                             रत्नागिरी ( संगमेश्वर ) ★ शिर्षक : ‘ चोरले मी...' मर्गावरती वेलीवरचे फुल चोरले मी.... कळून चुकले फुल नव्हे हृदय चोरले मी.... सांगुनी गेला तो वरुण ही कानी सारे निःशब्द होऊनी ऐकले मी.... उन्हाचा पारा मोकाट चढला  चटके ही स्तब्ध होऊन सोसले मी... कोकिळा गाई तालात बोलके पान फुले नारा...