★ प्रेरणादायी कविता
★ मोती शिंपल्यातला... ओल्या पुळणीतला तो गारवा स्पंदने जागी करुनी गेला.... लाटांनी ही त्या शिंपल्याला आनंदच दिला निराळा.... बांधील कवाडे खुले झाले भय ही उरातूनी हटविले.... नव्या आयुष्यास प्रारंभ केला आनंदाने मोत्याचे मन गहिवरले.... रुरळ्या वाटा राहिला एकटा शिंपला ही मागे पहुडला.... क्षणार्धात बदलले आयुष्य अनेक करांमधूनी तो रेंगाळला.... सुखद आयुष्य देण्या त्याला खरे आयुष्य शिंपल्याने वेचीले.... मोती तो शिंपल्यातला अनमोल धनीत राजापरी त्याचे सगे बनले.... ✍️ ओंकार जगदेव वाडकर ★ धावून बघ... आयुष्य आहे हे वेड्या, येतील त्या संकटांना झेलून बघ... क्षणात तिथं लाथ मारून, त्यापुढे एकदा तू धावून बघ... निर्दयी दगड होण्यापेक्षा, वेगळा दगड होऊन बघ... दगडातूनही पाझर फुटतो, जरा विहीरीमध्ये डोकाऊन बघ... शर्यतीत हार जीत होतच असते, तिला जरा आजमावून बघ... अपयश आलं तरी समाधान मान, अन् पुन्ह्यांदा जोमान धावून बघ... होतील अनेक वेदना बोचतील साऱ्या देहाला, तरी तू त्यांना गोंजारून बघ... मदत करतील त्याही तुला, मनातून थोड...