पोस्ट्स

प्रेरणादायी विचार

    नियम स्वतःसाठी ठेवा..            आपण असं जगताना काय करतो..?? सहजच प्रत्येक गोष्टीला जास्त महत्त्व देत असतो. कोणत्या गोष्टी केल्या तर काय होईल आणि काय नाही होणार हे सर्व. पण, हे सर्व नियम अटी सांभाळताना आपण स्वतःला हरवत असतो.त्याने काय करावं काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. प्रत्येकाला जे योग्य वाटत ते त्याने करावं. पण ते करताना त्यातलं चुकीचं सावट पूर्ण पांघरून जावू नये म्हणजे झालं.आत्ता कोणासाठी नियम असावे. त्याचं उत्तर आहे स्वतःसाठी मग कोणी ही असेल. आत्ता यात त्या आधी दोन गोष्टी येतात एक आवड आणि दुसरी नावड थोडक्यात, काय तर मला आवडत म्हणून मी करावं आणि समोरच्याला आवडेल का याचा विचार करणं अशा गोष्टी यात समाविष्ट होतात. नियम : -  १) स्वतःच्या मनाला रोज एक प्रश्न विचारा. २) रोज नवनवे विषय घ्या, त्यात अभ्यास करा, नवं ज्ञान मिळवायच्या प्रयत्नांत रहा. ३) कोण काय म्हणेल याचा विचार करणं सोडून द्यायचा ४) जी वेळ भेटेल मोकळा वेळ असेल ती आपली हक्काची वेळ आहे अस म्हणून सुरूवात करा. ५) यात मी माझं स्वतःचं मत सांगतो हरलो तर अनुभव मिळेल आणि जिं...

प्रेरणादायी विचार

स्वतःवर विश्वास ठेवा आणि ठाम राहा..             विश्वास ही अशी गोष्ट आहे ना की, आपण जर एखाद्या गोष्टीत दाखवला तर त्या दुप्पट आपल्याला मिळतो आणि त्या गोष्टीत भक्कमपणा येतो. यात नात असू शकेल, आपली स्वप्न, आणि मुके प्राणी या सर्वात मोठा समाविष्ट घटक म्हणजे विश्वास. जो कुणी काही सांगून, कुठे काही बोलून कुणाबद्दलचा खरा विश्वास कमी होतच नाही. अशा ठिकाणी नाती, आपली स्वप्न जास्त टिकतात. आशेची किरणं तिथंच दिसू लागतात जिथं काही तरी होण्याचा विश्वास असतो. आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि करताना काही दिवस अथवा महीने प्रयत्न करून सोडून देतो. आपल्याला सवय लागलेली असते की कोणती ही गोष्ट झाली तरी या जलद गतीच्या जमान्यामध्ये आपल्याला यश आपली स्वप्न ही अगदी सहज आणि जलद पूर्ण व्हावी आणि हवं ते मिळावं असं वाटतं. पण जिथं संघर्ष नाही ते यश ही चिरंतन नाही. जिथं स्वतःवर विश्वास नाही तिथं संघर्षाला ही अर्थ नाही.                  माझ्या मतांचा हेतू एवढाच आहे की, काही ही झालं तरी आपला आपल्या वर विश्वास असायला हवा.   एक तर असफल होऊ अथवा यशस्व...

प्रेरणादायी विचार...

  वेळ आणि ते         आपण जर म्हटलं ना मला कालच्या वेळेत काही काम करायचं आहे. तर, ते शब्दातून पूर्ण होईल पण प्रत्यक्षरित्या होण नाहीच. वेळ ही फार जलद आहे आणि एकदा निसटून गेली की कदापि न परत येणारी गोष्ट आयुष्यात गेलेली वेळ आणि दूर गेलेली माणसं कधीच परत त्यांच्या सहवासात आपलं आयुष्य येत नसतं.काही सेकंद एक पाऊल अशा पद्धतीनं आपण चालतो चालताना तोल जाईल का हे सुध्दा मनात आणत नाही आपण का तर तेवढ्या वेळेत कुठे तरी निश्चित ठिकाणी जायचं आहे. काही वेळ नाही शक्य होत पण बहुतांश वेळा आपण मागे पडतो का नाही ना.                वेळ आजवर कुणासाठी कधीच थांबली नाही. अगदी मी सुद्धा अनेक वेळ कारणांसाठी वेळेचा आधार घेतला होता. पण, हरकत नाही ज्यात आवड आहे त्यात जसा वेळ मोकळा असेल तेव्हा आपण आपली आवड आवड न ठेवता तिला थोडी सवड काढून नक्की खेळती ठेवली पाहिजे.एक झाड असत आणि त्यावर दोन चिमण्या राहतात एक तशी स्वाभाविक आणि व्यावहारिक असते. ती स्वतः स्वतःच्या कामांना प्राधान्य देत असते दुसरी थोडी अवखळ मज्जा मस्ती करणारी असते. तिला कोणती काम वेळेवर व्हावी ...

★ प्रेरणादायी विचार

इमेज
★ समस्या म्हणजे यातनांनी भरलेला डोह नव्हे...                 आपण आपल्या खऱ्या आयुष्यात पूर्ण दिवस काही ना काही करत असतो मग ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस किंवा व्यावसाय सुद्धा असू शकतो. आत्ता माणूस म्हणून जगताना काही काळ ताण यातना समस्या हे सर्व होणारच ना त्याशिवाय आयुष्य आनंदात कुणी जगत आहे अस या जगाच्या पाठीवर कुठेच घडलं नाहीय. हरकत नाही कुणी यातून बाहेर येतं तर कुणी येऊ पाहत पण कालांतराने तो बाहेर येतो. पण, काही असे ही असतात की फक्तं ही समस्या अशी आहे ते तसं आह येवढं करतात आणि तिथेच दाबून राहतात.                   आपण शालेय जीवनात अभ्यास केला आनंद व्यक्त केला बागडलो म्हणजे ते खरं आयुष्य असल्यासारखं वाटतं आणि ते खर आहे पण आत्ताला ते घडण ही अशक्य आहे. अर्थात काय वेळ काय सांगते माझ्यासमवेत पुढे चल नक्कीच मोठा होशील. लहापणापासूनच वाटायचं मोठा झालो की हे करेन ते करेन पण आत्ता त्यासाठी फारस नाही पण थोडफार अवघडल्यासारखं वाटतं. यात ही मोठा फरक आहे की लहानपणी एक ताकद एक ऊर्जा होती की मोठे पणी हे करायचं. आणि आज त्य...

प्रेरक विचार

इमेज
★ ख़ुद को पहचानो और सबसे ज़्यादा भरोसा ख़ुद पर करो..                 आप कभी पहाड़ पर गए होंगे और वहां पर अपनी गूंज भी सुनी होगी जो बार बार गूंजती रहती हैं। उससे क्या सीख मिलती है कभी सोचा है। अगर आप ऐसा करते भी हो तो बस बाद में भूलते भी होंगे कि चल यार जाने दो कौन सोचेगा करेगा इतना। उसका मतलब होता है आप जो भी हो बस गूंजते रहो अपने लक्ष्य के पागलपन में आवाज़ एक बार दस लोगों तक पहुंच सकती है सौ या हज़ार लोगों तक नहीं पहुंच सकती। यादी आप उस आवाज़ को पूरे तन मन से इस दुनियां तक पहुंचाना चाहते हो तो उसे बार बार गूंजना ही होगा। तब कहीं जाकर वो पहाड़ियों जैसा महसूस कर सकते हो। उस आवाज़ में ना एक सरलता और निर्भय रहता हैं बस उसे अच्छे से सुनकर पहचानना है आपको और सच में ख़ुद को पहचानो और ज़िंदगी में आगे बढ़ो।                 मैंने कभी ऐसा नहीं देखा है कि मछली ज़मीन पर खेल रही है और आकाश में हिरन उड़ रहा है। ऐसा हो भी नहीं सकता क्योंकि हर एक जानवर अपने अपने अलग अलग तरीकों के कला के लिए समर्थ है। और वो वहीं करता है...

★ प्रेरणादायी विचार

इमेज
  ★ मनाची शांती कशी शोधावी अथवा मन एकाग्र कसे करावे             मन हे खुप मोठा आधार असतो तो आपल्या शरीराचा आपल्या मानसिकतेचा. मनाला शांत आणि एकाग्र ठेवण्याचा अनेक जण आपल्या आपल्या परीनं अथक प्रयत्न करतात. पण, यश यात त्यांनाच येते जे जोमान या गोष्टीचा पाठपुरावा करतात. कारण स्वप्नाचा पाठलाग करताना आणि आपले दैनंदिन जीवन जगताना आपल्याला मन शांत ठेवावं लागतं. मनाची शांती पूर्णपणे कधीच अस्तित्वात नसते मन बऱ्याचदा या गोष्टीवरून त्या गोष्टीवर फिरकत असते हा प्रवास कायम चालूच असतो. ठरवलेल्या कामामध्ये फक्तं काही क्षण फक्तं शांती मिळते आणि घेता सुद्धा येते पण अखेर तीच परिस्थिती येते की मनाला एकाग्र करण प्रत्येकाला कठीण असतं.                मन हे एक अधिकार गाजविणारा आपल्या शरीरातला असा अवयव आहे की, जो आपल्याला सत्कर्म आणि कुकर्म करायला भाग पाडतो. हे तेव्हाच शक्य होत जेव्हा आपण मनाच्या आहारी जातो. एखादी गोष्ट मिळावी म्हणून लालची बनतो. राग, क्रोध, मोह, मत्सर आणि माया ही पंचद्रिये आहेत जे मनाला शांत निखळ प्रवाहातून बाहेर खेचून ...

★ प्रेरणादायी कविता

  ★ मोती शिंपल्यातला... ओल्या पुळणीतला तो गारवा स्पंदने जागी करुनी गेला.... लाटांनी ही त्या शिंपल्याला आनंदच दिला निराळा.... बांधील कवाडे खुले झाले भय ही उरातूनी हटविले.... नव्या आयुष्यास प्रारंभ केला आनंदाने मोत्याचे मन गहिवरले.... रुरळ्या वाटा राहिला एकटा शिंपला ही मागे पहुडला.... क्षणार्धात बदलले आयुष्य अनेक करांमधूनी तो रेंगाळला.... सुखद आयुष्य देण्या त्याला खरे आयुष्य शिंपल्याने वेचीले.... मोती तो शिंपल्यातला अनमोल धनीत राजापरी त्याचे सगे बनले....                 ✍️ ओंकार जगदेव वाडकर        ★ धावून बघ... आयुष्य आहे हे वेड्या, येतील त्या संकटांना झेलून बघ... क्षणात तिथं लाथ मारून, त्यापुढे एकदा तू धावून बघ... निर्दयी दगड होण्यापेक्षा, वेगळा दगड होऊन बघ... दगडातूनही पाझर फुटतो, जरा विहीरीमध्ये डोकाऊन बघ... शर्यतीत हार जीत होतच असते, तिला जरा आजमावून बघ... अपयश आलं तरी समाधान मान, अन् पुन्ह्यांदा जोमान धावून बघ... होतील अनेक वेदना बोचतील साऱ्या देहाला, तरी तू त्यांना  गोंजारून बघ... मदत करतील त्याही तुला, मनातून थोड...