आईचं पत्र हरवलं....!!
🖋️ लेखन - ओंकार जगदेव वाडकर एक वेळ होती जिथं नात्यांचा एकोपा जपून ठेवला जात असे. त्या काळी सामाजिक माध्यमे ही फारशा प्रमाणात नसायची पण तरी ही एखाद्याची मनापासून ओढ लागायची. त्या वेळी दरवाजावर आलेला पोस्टमन पाहताच माणस ओळखून जायची काही तरी बातमी आलीय आणि दुःख असो अथवा सुख प्रत्येकजण एकमेकांना आधार देत असे. चार शब्द भेटून बोलणं अथवा या शब्दातून बोलणं या साऱ्यांची त्या क्षणी नवलच वाटायची. कारण तेव्हा माणसाकडे वेळ ही मुबलक असायचा आणि माणसंही जोडली जायची. पत्राद्वारे केली जाणारी चौकशी यात ही प्रेम होत. लहानपणी एक खेळ खेळला जायचा ‘ आईच पत्र हरवल ते मला सापडलं ’ किती तरी मोठ्या प्रमाणावर आनंद देऊन जायचा आणि आज ही ती आठवण क्षणात डोळ्यासमोर उभा करून जातो असा हा खेळ होता. संपूर्ण बिनखर्चिक, कमी संख्येत अथवा जास्त संख्येत, जास्त धावपळ न करता, मोठ्या प्रमाणावर खेळला जायचा. काही सव...