★एक प्रेम कथा



“ ती आणि तो....”

           लेखन : ओंकार जगदेव वाडकर


                      कधी न कळणारे भाव प्रेमाचे जतन करत असतात.अश्या वेळी प्रेम मनात असते खरे पण सांगायला आणि स्पष्ट मोकळं व्हायला काहीजण घाबरत असतात. अशीच एक गोष्ट आहे ती आणि तो एक सत्य घटना आहे प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्याला समजून घेणारा, चुकल्या वेळी समजावून सांगणारा असावा एवढंच वाटतं. कधी त्याला ही वाटायचं आपण तिच्या समोर मोकळं व्हावं आणि तिला ही सांगून टाकावं आपलं प्रेम पण, बिचारा तो तरी काय करणार होता ना एकीकडे एक घट्ट असं मैत्रीचं नातं होतं आणि दुसरीकडे  एक बाजूने वाटणार त्याच मनापासून केलं जाणारं प्रेम. त्याला ही भाव कळत होते पण तिच्या मनातून खूप साऱ्या गोष्टी समजून घ्यायच्या होत्या शेवटी तो ही समजूतदार होताच आणि त्याच प्रेम हे नव्हतं की तिला कोणत्याही परिस्थिती मध्ये मिळवायचं. तिच्या सहमतीने आपलं प्रेम व्यक्त करून तिच्या आनंदात आपला आनंद शोधून तिच्या समवेत आयुष्याची पुढची वाटचाल करावी एवढंच वाटायचं.

                          आयुष्यातून प्रकाश निघून गेला उरतो तो अंध:कार आणि यात होते ती होळी या शरीराची या मनाची हे  त्याला ही माहिती होत आणि तितकच चांगलं तिला ही माहिती होत. दोघे पण एकमेकांच्या शब्दाची वाट बघत होते की ज्यातून त्यांना एक नव्यानं सुरुवात करायची होती. खर तर तो लाजऱ्या स्वभावाचा होता खरा पण, तितकाच बोलका ही होता आत्ता प्रश्न होता तो तिचा ती तर बोलकी होतीच पण सगळ्या गोष्टी कुणाला काय म्हणून सांगणार हा विचार तिच्या मनात यायचा आणि ती सांगणं टाळायची आणि मनातल्या मनात लपवत कण्हत उशाला फक्त स्वप्न घेऊन जगायचं अस मनाशी पक्क केलं होत. तिचा ही बेत व्हायचा एकदा तरी एक मैत्रीण म्हणून त्याला भेटुन बोलावं अगदीच नाही पण मनातलं काय गुपित असेल तर तर वेगळ्या प्रकारे व्यक्त करून आपण ही आपल्या मनातलं त्याला सांगावं. पण ते आज ही अशक्यच होत पुढे वेळ ही फारशी येणार नाही हे ही दोघांना माहिती होत. पण, एकमेकांच्या आठवणींनी जगण्याशिवाय आत्ता पर्याय ही उरला नव्हता. कुठे ती चेहऱ्याची भेट व्हायची ती ही आत्ता उरली नव्हती दोघे ही शिक्षणानिमित्त वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करू लागले. आज ओठांवर होत ते फक्त तीच नाव बाकी खास आठवण अशी दोघांकडेही नव्हती.

                     विचारानं काहूर माजलं होत की, भेट व्हायची कशी सर्व काही कठीण बनल होत. यास अपवाद होता तो त्यांचा एकमेकांशी लाजरेपणाने असणारा अबोला. त्यानं खुप वेळा ठरवलं की तिला शोधून काढलं पाहिजे आणि आपलं मनातलं मत मांडायच तिच्या छोट्याश्या गावात आपला प्रवाह सुरू ठेवायचा. ईकडे ती सुद्धा काहीशी अस्वस्थ होत गेली शेवटी मनातल्या भावना अनावर नाही झाल्या की दोघे ठरवायचे कुठे ही जायचं पण भेटायचं.अखेर शांत पणे विचार करून हे सर्व काल्पनिक आणि कथाजनक आहे असच वाटायचं आणि थोडा एकांत घेऊन समजूत मनाची काढून आपलं प्रेम मनातच गुडूप करायचे.ते ही दिवस त्यांच्या साठी खास होते की बोलायची हिम्मत जरी नसली तरी नजरेला नजर थोडी का होईना पण होऊन जायची. आजवर येवढं दूर कधी ही गेले नव्हते ती आणि तो शाळेपासून एकत्रच होते पण फारसा मोकळेपणाने संवाद कधीच झाला नव्हता हेच कायम त्यांच्या मनाला बोचत होतं.आज ही एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल तोच आदर तेच प्रेम टिकून होते. फक्तं नशीबी होता तो विरह जो कधी संपेल याची दोघांनाही खात्री नव्हती.

                      आज ही तीच आशा आहे तेच पेच त्याच आठवणी आहेत ज्या आठवल्या की अजून ताज्या असल्या सारखंच वाटतं. शेवटी प्रेम हे प्रेम असत भले कधी आंधळ आहे असं म्हटलं जातं खरं. पण, आज तेच प्रेम त्याच आशेनं त्याच भावनेनं एकमेकांत मिसळून विरहात जगताना सुद्धा मनानं जवळ असल्याचं मनाशीच ठरवतात. नाही माहिती “ती आणि तो” आत्ता पुन्हा केव्हा एकत्र येतील आणि आपलं मत केव्हा एकमेकांसमोर मांडतील. पण, जेव्हा मात्र एकत्र येतील तेव्हा मात्र त्यांच्या आयुष्यात सोनेरी क्षण असतील. त्या खऱ्या प्रेमाची सुरुवात एका नव्या वेळेत आणि नव्या आयुष्यात होईल याच आशेनं आज ही जगत असतील.....

 “ ती आणि तो ”......


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

If you have any questions, doubts and want to information so plz let me know..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★