प्रेरणादायी विचार
नियम स्वतःसाठी ठेवा.. आपण असं जगताना काय करतो..?? सहजच प्रत्येक गोष्टीला जास्त महत्त्व देत असतो. कोणत्या गोष्टी केल्या तर काय होईल आणि काय नाही होणार हे सर्व. पण, हे सर्व नियम अटी सांभाळताना आपण स्वतःला हरवत असतो.त्याने काय करावं काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. प्रत्येकाला जे योग्य वाटत ते त्याने करावं. पण ते करताना त्यातलं चुकीचं सावट पूर्ण पांघरून जावू नये म्हणजे झालं.आत्ता कोणासाठी नियम असावे. त्याचं उत्तर आहे स्वतःसाठी मग कोणी ही असेल. आत्ता यात त्या आधी दोन गोष्टी येतात एक आवड आणि दुसरी नावड थोडक्यात, काय तर मला आवडत म्हणून मी करावं आणि समोरच्याला आवडेल का याचा विचार करणं अशा गोष्टी यात समाविष्ट होतात. नियम : - १) स्वतःच्या मनाला रोज एक प्रश्न विचारा. २) रोज नवनवे विषय घ्या, त्यात अभ्यास करा, नवं ज्ञान मिळवायच्या प्रयत्नांत रहा. ३) कोण काय म्हणेल याचा विचार करणं सोडून द्यायचा ४) जी वेळ भेटेल मोकळा वेळ असेल ती आपली हक्काची वेळ आहे अस म्हणून सुरूवात करा. ५) यात मी माझं स्वतःचं मत सांगतो हरलो तर अनुभव मिळेल आणि जिं...