प्रेरणादायी विचार
नियम स्वतःसाठी ठेवा..
आपण असं जगताना काय करतो..?? सहजच प्रत्येक गोष्टीला जास्त महत्त्व देत असतो. कोणत्या गोष्टी केल्या तर काय होईल आणि काय नाही होणार हे सर्व. पण, हे सर्व नियम अटी सांभाळताना आपण स्वतःला हरवत असतो.त्याने काय करावं काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. प्रत्येकाला जे योग्य वाटत ते त्याने करावं. पण ते करताना त्यातलं चुकीचं सावट पूर्ण पांघरून जावू नये म्हणजे झालं.आत्ता कोणासाठी नियम असावे. त्याचं उत्तर आहे स्वतःसाठी मग कोणी ही असेल. आत्ता यात त्या आधी दोन गोष्टी येतात एक आवड आणि दुसरी नावड थोडक्यात, काय तर मला आवडत म्हणून मी करावं आणि समोरच्याला आवडेल का याचा विचार करणं अशा गोष्टी यात समाविष्ट होतात.
नियम : -
१) स्वतःच्या मनाला रोज एक प्रश्न विचारा.
२) रोज नवनवे विषय घ्या, त्यात अभ्यास करा, नवं ज्ञान मिळवायच्या प्रयत्नांत रहा.
३) कोण काय म्हणेल याचा विचार करणं सोडून द्यायचा
४) जी वेळ भेटेल मोकळा वेळ असेल ती आपली हक्काची वेळ आहे अस म्हणून सुरूवात करा.
५) यात मी माझं स्वतःचं मत सांगतो हरलो तर अनुभव मिळेल आणि जिंकलो तर नाव मग, प्रयत्न करणं सोडायचं नाही.
६) सकारात्मक ऊर्जा आत्मसात करायचा प्रयत्न ठेवायचा.
७) घडणाऱ्या गोष्टीत सकारात्मक बाजू जास्त पाहायची.
८) स्वतःला जे आवडतं त्यात मनापासून काम करा हे अनेक प्रेरणादायी वक्ते नक्कीच सांगतात मग आपण मागे का व्हायचं.
९) नेहमी दिवसातून एकदा अशा व्यक्तीकडे पाहा की ती काही नसताना सुद्धा अगदीं सहज रित्या आनंदात राहते.
१०) स्वतःला ओळखा बनावट गोष्टींच्या मागे वळून पहायचं नाही.
एवढं जर आपण दर दिवशी अगदी नियमितपणे हे नियम स्वतःशी प्रामाणिक राहून पाळले ना तर माझा स्वतःचा अनुभव आहे की नक्कीच बदल घडेल आणि प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळी तुम्ही सकारात्मक राहून स्वतःला बदलायच्या मार्गावर याल. आणि मनापासून प्रयत्न कराल.
लेखन : ओंकार जगदेव वाडकर
संगमेश्वर, रत्नागिरी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions, doubts and want to information so plz let me know..