★ प्रेरणादायी विचार
★ मनाची शांती कशी शोधावी अथवा मन एकाग्र कसे करावे मन हे खुप मोठा आधार असतो तो आपल्या शरीराचा आपल्या मानसिकतेचा. मनाला शांत आणि एकाग्र ठेवण्याचा अनेक जण आपल्या आपल्या परीनं अथक प्रयत्न करतात. पण, यश यात त्यांनाच येते जे जोमान या गोष्टीचा पाठपुरावा करतात. कारण स्वप्नाचा पाठलाग करताना आणि आपले दैनंदिन जीवन जगताना आपल्याला मन शांत ठेवावं लागतं. मनाची शांती पूर्णपणे कधीच अस्तित्वात नसते मन बऱ्याचदा या गोष्टीवरून त्या गोष्टीवर फिरकत असते हा प्रवास कायम चालूच असतो. ठरवलेल्या कामामध्ये फक्तं काही क्षण फक्तं शांती मिळते आणि घेता सुद्धा येते पण अखेर तीच परिस्थिती येते की मनाला एकाग्र करण प्रत्येकाला कठीण असतं. मन हे एक अधिकार गाजविणारा आपल्या शरीरातला असा अवयव आहे की, जो आपल्याला सत्कर्म आणि कुकर्म करायला भाग पाडतो. हे तेव्हाच शक्य होत जेव्हा आपण मनाच्या आहारी जातो. एखादी गोष्ट मिळावी म्हणून लालची बनतो. राग, क्रोध, मोह, मत्सर आणि माया ही पंचद्रिये आहेत जे मनाला शांत निखळ प्रवाहातून बाहेर खेचून ...