प्रेरणादायी विचार...

 


वेळ आणि ते


        आपण जर म्हटलं ना मला कालच्या वेळेत काही काम करायचं आहे. तर, ते शब्दातून पूर्ण होईल पण प्रत्यक्षरित्या होण नाहीच. वेळ ही फार जलद आहे आणि एकदा निसटून गेली की कदापि न परत येणारी गोष्ट आयुष्यात गेलेली वेळ आणि दूर गेलेली माणसं कधीच परत त्यांच्या सहवासात आपलं आयुष्य येत नसतं.काही सेकंद एक पाऊल अशा पद्धतीनं आपण चालतो चालताना तोल जाईल का हे सुध्दा मनात आणत नाही आपण का तर तेवढ्या वेळेत कुठे तरी निश्चित ठिकाणी जायचं आहे. काही वेळ नाही शक्य होत पण बहुतांश वेळा आपण मागे पडतो का नाही ना. 

              वेळ आजवर कुणासाठी कधीच थांबली नाही. अगदी मी सुद्धा अनेक वेळ कारणांसाठी वेळेचा आधार घेतला होता. पण, हरकत नाही ज्यात आवड आहे त्यात जसा वेळ मोकळा असेल तेव्हा आपण आपली आवड आवड न ठेवता तिला थोडी सवड काढून नक्की खेळती ठेवली पाहिजे.एक झाड असत आणि त्यावर दोन चिमण्या राहतात एक तशी स्वाभाविक आणि व्यावहारिक असते. ती स्वतः स्वतःच्या कामांना प्राधान्य देत असते दुसरी थोडी अवखळ मज्जा मस्ती करणारी असते. तिला कोणती काम वेळेवर व्हावी यासाठी चिंता नसते. पहिली चिमणी घरट बांधते आणि ही उडत असते पहिली चिमणी दाणे जाणवते तर दुसरी जे पडेल ते खाते असे दिवसा मागून दिवस जातात हीच उडण चालूच असतं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर पहिली चिमणी म्हणते काय ग तू काही घर बांधणार आहेस की...?? तेवढ्यात ती म्हणते पाऊस कुठे आलाय आणि कोण येणार आहे येवढ्यात खायला हे ऐकून ती शांत राहते.काही वेळ मध्ये निघून जातो आणि एक घार येते पहिली चिमणी पटकन घरट्यात जाते आणि तिला बोलवणार ईतक्यात ती घार समोर येते आणि ती चिमणी ला आपली शिकार बनवते. 

                 थोडक्यात, काय तर त्या चिमणीन सुद्धा वेळेचं भान ठेवून स्वतःच्या रक्षणाला आणि जीवनाला आवश्यक अस कुंपण घातलं असतं तर आज तिचा ही जीव सुखरूप असता.पण, तीन केवळ केला तो आनंद, व्यर्थ पणा अर्थातच.. वेळेच्या आदरातिथ्यास आपण राहिलो तर वेळ ही आपलं आदरातिथ्य एक दिवस नक्कीच करते.दोन तासांत जी गोष्ट करायची आहे होत नसेल चार तासात करा पण, करा कारण सुरूवात तुमची असेल खुप साऱ्या समस्या येतील पण त्यात वेळेबरोबर टिकून ही राहता आलं पाहिजे. आज अशी सुद्धे माणसं असतात की वेळ नाही मिळत काही गोष्टी करायला मी सुद्धा त्यातलच एक होतो पण जर गेलेल्या वेळेत आपण नाही काही करु शकलो निदान थोड फार शिकता आलं ना आपल्याला तरी त्या वेळेचं थोड फार का होईना आपण मोल केलं अस समजून जायचं.वेळ दोन गोष्टी नक्कीच करते एक तर आपल्याला अनुभव देते आणि दुसरी आपला अनुभव दुसऱ्या व्यक्तींना सांगण्यासारख नक्कीच बनवते.

                    हे सहज शक्य नाही होत यामागे प्रयत्न फार मोलाचे असतात. येणारी वेळ आणि स्वप्न सोबत घेवून कस निघायचं आपल्यावर असत. वेळ तर मार्ग मोकळे करते तिथं चालायचं का बसून राहायचं आपल्याला ठरवायचं असतं. कुणाची वेळ वाईट असली म्हणून हसायचं ही नसत. न जाणो उद्या तो त्याहून चांगलं असेल वेळ सगळ्यांना मदत करते फक्त आपण वेळेशी प्रामाणिक राहायचं.जो मोकळा वेळ आहे त्यातून छोट्या छोट्या कामाला सुरूवात करा..वेळ तुम्हाला साथ नक्की देईल...  

         लेखन : ओंकार जगदेव वाडकर

                  संगमेश्वर, रत्नागिरी


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

If you have any questions, doubts and want to information so plz let me know..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★