प्रेरणादायी विचार



स्वतःवर विश्वास ठेवा आणि ठाम राहा..

            विश्वास ही अशी गोष्ट आहे ना की, आपण जर एखाद्या गोष्टीत दाखवला तर त्या दुप्पट आपल्याला मिळतो आणि त्या गोष्टीत भक्कमपणा येतो. यात नात असू शकेल, आपली स्वप्न, आणि मुके प्राणी या सर्वात मोठा समाविष्ट घटक म्हणजे विश्वास. जो कुणी काही सांगून, कुठे काही बोलून कुणाबद्दलचा खरा विश्वास कमी होतच नाही. अशा ठिकाणी नाती, आपली स्वप्न जास्त टिकतात. आशेची किरणं तिथंच दिसू लागतात जिथं काही तरी होण्याचा विश्वास असतो. आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि करताना काही दिवस अथवा महीने प्रयत्न करून सोडून देतो. आपल्याला सवय लागलेली असते की कोणती ही गोष्ट झाली तरी या जलद गतीच्या जमान्यामध्ये आपल्याला यश आपली स्वप्न ही अगदी सहज आणि जलद पूर्ण व्हावी आणि हवं ते मिळावं असं वाटतं. पण जिथं संघर्ष नाही ते यश ही चिरंतन नाही.
जिथं स्वतःवर विश्वास नाही तिथं संघर्षाला ही अर्थ नाही.

                 माझ्या मतांचा हेतू एवढाच आहे की, काही ही झालं तरी आपला आपल्या वर विश्वास असायला हवा. एक तर असफल होऊ अथवा यशस्वी बनू. असफल होऊन ही खुप मोठा अनुभव मिळेल आणि यश अनुभव सांगेल. हा एवढाच फरक आहे बस त्यातलं अंतर ओळखता आलं पाहिजे. आणि प्रयत्नावर जोर देवून स्वतःला विश्वासात घेवून आपल्याला सातत्याने त्या निश्चित वाटेवर चालता आलं पाहिजे. 
                  साधा विचार केला तर, चालताना आपल्याला ठेच लागते आणि समोर असतो तो दगड. त्याला काही होणार नाही हे आपल्याला माहिती असतं, कारण त्याला शृष्टीन भक्कमपणा देवू केलाय. त्याला हे माहिती असतं की मी अगदीच नाही तर कुठे तरी चांगल्या ठिकाणी उपयोगी नक्की येईन. आणि एका भक्कम बांधकामासाठी हा एका विशिष्ट दगडांचा वापर केला जातो. हाच भक्कमपणा, हाच विश्वास आपल्या स्वतःमध्ये असायला हवा. बोलणारे बोलतील हसणारे हसतील हसू द्या पण आपण आपला ठाम पणा नाही सोडायचा. मी सुद्धा नकळत अनेक चुका करून गेलो की, थोडाफार का होईना कौशल्य असताना सुद्धा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे काही नाही करू शकलो. 
पण, हरकत नाही सुरुवात करण नेहमीच उत्तम हे त्यापेक्षा की भय आपण भय बाळगतो हे टाळून आपण सुरूवात केली पाहिजे.

                 एवढा मोठा भला डोंगर अगदी न दिसणाऱ्या वाऱ्याच्या अफाट माऱ्यान उध्वस्त होतो. तिथली सजीव सृष्टी नष्ट होत असेल पण त्या डोंगरामध्ये स्वतःच्या अस्तित्त्वासाठी असणारा संघर्ष कधीच संपत नाही. कारण त्याचा स्वतःवर विश्वास असतो आणि तो ठाम असतो आज नाही तर कालांतराने आपल आपल्याला अस्तित्त्व निर्माण करायचच आहे. पुन्हा तो डोंगर अगदी भरून येतो. हाच आत्मविश्वास अन् भक्कमपणा आपल्याला घेता आला पाहिजे. किती तरी त्रास होईल संकटे येतील आपलेच नकारात्मक विचार देतील पण आपण न डगमगता प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. स्वप्न लहान असो अथवा मोठ पण प्रयत्न सातत्याने करणं ही गोष्ट साऱ्यांना एक आहे मग भिती का..?? प्रत्येक स्पर्धेत जिंकण म्हणजे स्पर्धा नाही होत. हरल्यानंतर ही त्यातून शिकून पुढे जाणं ही सुद्धा स्पर्धाच असते ना. मनात ठाम ठेवा हरेन हरकत नाही पण प्रयत्न करेन नाहीच झालं तर शिक्षण घेवून पुन्हा जोमान जगेन.
 
          🖋️  लेखन : ओंकार जगदेव वाडकर
                               संगमेश्वर, रत्नागिरी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★