★ प्रेरणादायी कविता

 


★ मोती शिंपल्यातला...



ओल्या पुळणीतला तो गारवा

स्पंदने जागी करुनी गेला....

लाटांनी ही त्या शिंपल्याला

आनंदच दिला निराळा....


बांधील कवाडे खुले झाले

भय ही उरातूनी हटविले....

नव्या आयुष्यास प्रारंभ केला

आनंदाने मोत्याचे मन गहिवरले....


रुरळ्या वाटा राहिला एकटा

शिंपला ही मागे पहुडला....

क्षणार्धात बदलले आयुष्य

अनेक करांमधूनी तो रेंगाळला....


सुखद आयुष्य देण्या त्याला

खरे आयुष्य शिंपल्याने वेचीले....

मोती तो शिंपल्यातला अनमोल

धनीत राजापरी त्याचे सगे बनले....

                ✍️ ओंकार जगदेव वाडकर

      

★ धावून बघ...


आयुष्य आहे हे वेड्या, येतील त्या संकटांना झेलून बघ...

क्षणात तिथं लाथ मारून, त्यापुढे एकदा तू धावून बघ...


निर्दयी दगड होण्यापेक्षा, वेगळा दगड होऊन बघ...

दगडातूनही पाझर फुटतो, जरा विहीरीमध्ये डोकाऊन बघ...


शर्यतीत हार जीत होतच असते, तिला जरा आजमावून बघ...

अपयश आलं तरी समाधान मान, अन् पुन्ह्यांदा जोमान धावून बघ...


होतील अनेक वेदना बोचतील साऱ्या देहाला, तरी तू त्यांना 

गोंजारून बघ...

मदत करतील त्याही तुला, मनातून थोडं त्यांच्याशी हलकं 

होऊन बघ...


काही विचार करू नको, नसेल सुरूवात तर आत्ता सुरूवात 

करून बघ...

हार मानण्याआधी एकदा विचार कर, अन् आयुष्यात एकदा तरी 

धावून बघ...


अरे..!! पाण्यासारखं वाहून बघ, त्याच्यासारखं तू सांडून बघ...

खडकातही अंकुर ऊगवण्याची, जिद्द मनात ठेऊन बघ...

पण, आयुष्यात एकदा तरी धाऊन बघ..!!

   


★ उसनं....!!!


आंगभर कापडं द्या रहायला झोपडं द्या....

फारसं नको फकस्त पोटाला घास द्या....

 

फुटी कवडी नाय माजेकडं तेवढ जरा समजून,

फाटक्या या तलव्यांना चटक्यापासून झाकू द्या...


माजं घर ना दार मग रस्त्यावर माजं असन,

व्हय..! नकावडं तुमचं येनं जानं कधीतरी व्हवू द्या...


चंगलं नाय वाटत काचेत आमास झोपडीतचं बरं,

देनं घेनं जरा आपलं उसनं म्हनून बघू द्या...


पावसा पान्याचं काय पडतय आमच्या अंगावर,

थंडी खाते म्हनून ईस्तव आडूशाला पेटवू द्या...


हात पसरतोय मी ही करेन परत तुमास सार,

त्या वेलेला आमची ही ओळख मात्र असू द्या...


वेलेचं काय ओ.. ती ही एकदा निघून जाईल,

रस्त्यावर का होईना  त्या झोपड्यातचं मला राहू द्या...


वाटल थोडं मोप मागतोय तर एक जरूर बोला,

एवड सारं मी उसनं म्हनूनच देईन,

पण, खरं सांगतो सायब मला हे 

उसनं म्हनूनच राहूद्या..!!!

उसनं म्हनूनच राहूद्या..!!!




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★