★ प्रेरणादायी विचार
★ समस्या म्हणजे यातनांनी भरलेला डोह नव्हे...
आपण आपल्या खऱ्या आयुष्यात पूर्ण दिवस काही ना काही करत असतो मग ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस किंवा व्यावसाय सुद्धा असू शकतो. आत्ता माणूस म्हणून जगताना काही काळ ताण यातना समस्या हे सर्व होणारच ना त्याशिवाय आयुष्य आनंदात कुणी जगत आहे अस या जगाच्या पाठीवर कुठेच घडलं नाहीय. हरकत नाही कुणी यातून बाहेर येतं तर कुणी येऊ पाहत पण कालांतराने तो बाहेर येतो. पण, काही असे ही असतात की फक्तं ही समस्या अशी आहे ते तसं आह येवढं करतात आणि तिथेच दाबून राहतात.
आपण शालेय जीवनात अभ्यास केला आनंद व्यक्त केला बागडलो म्हणजे ते खरं आयुष्य असल्यासारखं वाटतं आणि ते खर आहे पण आत्ताला ते घडण ही अशक्य आहे. अर्थात काय वेळ काय सांगते माझ्यासमवेत पुढे चल नक्कीच मोठा होशील. लहापणापासूनच वाटायचं मोठा झालो की हे करेन ते करेन पण आत्ता त्यासाठी फारस नाही पण थोडफार अवघडल्यासारखं वाटतं. यात ही मोठा फरक आहे की लहानपणी एक ताकद एक ऊर्जा होती की मोठे पणी हे करायचं. आणि आज त्या वेळी करताना समस्या आल्या की आपण हाताश होतो पूर्ण निराशाजनक कामगिरी व्यक्त करतो. आपण हा विचार नाही करत की वेळेन आपल्याला पुन्ह्यांदा साथ द्यायचं ठरवलं आहे माझी एक मोठी संधी आहे ही. पण समस्या म्हणजे डोक्याला ताप, माणसाला भयभीत करतात यातना होतात खुप त्रास होतो तेवढ्यातच आपलं विचारांचं काहूर पसरवत जगतो आणि या समस्या यातना द्यायला नाही येतं ती केवळ एक परिक्षा असते . आपल्यात सकारात्मक दृष्टीकोन फक्त नावारूपी आहे हे पाहायला आपल्याला गरजेचं आहे.
★ आत्ता समस्या म्हणजे काय...??
हजार प्रकारे असू शकतात समस्या काही गरीब श्रीमंत नेते लोक अथवा एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात म्हणून येत नाही. ती एक आयुष्याची वाट आहे जिथं केवळ अश्रूंचा पूर आणि न दिसणारे काटे जे मनाला टोचतात. आणि म्हणून काहींना वाटतं की समस्या यातनांनी भरलेला डोह आहे. मी तर म्हणतो तसं मुळीच नाहीय.
साधा विचार करा. आपल्या पायात काटा लागला तर थोड व्याकूळ होतो. पण पुन्हा धीट होऊन दुसऱ्या हातानं तो बाहेर काढतो. माहिती असत हा काटा आपल्यालाच बाहेर काढायला हवा मग आयुष्यात अस का..?? तिथं एवढी खोलवर अशी मानहानी सहन का करतो आपण?? समस्या सगळ्यांना आहेत देव, ऋषी, सगळ्यांना होत्या आणि आज ही समस्या आहेत पण त्यांच्याकडे समस्येवर मात करण्यासाठी एक सकारात्मक दृष्टीकोन अन् ऊर्जा होती. मग, ती आपल्याकडे आहे का याचा शोध घ्या..!! श्री राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज कोणतंही युद्ध तयारीवेळी एका गोष्टीचा नक्कीच विचार करत की या नंतर अजून किती मावळे धारातिर्थी पडतील. पण मावळ्यांनी ही शब्द दिला होता की आमचे प्राण गेले तरी चालेल राजे पण स्वराज्य स्थापन व्हावे आणि आपली सेवा करता यावी.
थोडक्यात काय, तर आपण जगताना आपल्या आजूबाजूची परिस्थिती सुद्धा यावर परिणाम करते.आपण नेहमी जर सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या व्यक्ती सोबत असू ना तर आपलं पुढे काय होईल याची चिंता मुळीच नसते हीच ताकद श्री शिवाजी महाराज्यांच्या शब्दात होती. ज्याला समस्येशी संघर्ष करता आला ना तो नक्कीच वेळ उशिरा का होईना पण पुढे जातो. आणि तो त्यावेळी हार मानतो तोच मागे पडतो. महापूर आला की सार काही वाहून जात घरे उद्ध्वस्त होतात झाडे वेली जनावरे सुद्धा मरतात. म्हणून निसर्ग चक्र थांबत नाही ना. त्याच ठिकाणी झाडे पुन्हा आपलं अस्तित्त्व निर्माण करू पाहतात. समस्या प्रत्येकाला आहेत पण त्यात मार्ग सुद्धां आहे तो शोधता आला पाहिजे.
फक्तं एवढा विचार नव्हे की समस्या म्हटलं की यातना आणि भोग दुःख त्या पलीकडे स्वतःला झोकून द्या. दुसरीकडून नाही तर स्वतःच्या मनातून तुम्हाला ऊर्जा मिळेल उत्तर मिळेल. तेव्हा आपल्याला कळेल की समस्या का येतात. आणि त्याच उत्तर असेल you can do it....
लेखन : ओंकार जगदेव वाडकर
संगमेश्वर, रत्नागिरी
Great ! ,very inspiring, keep writing like that , and keep inspiring.
उत्तर द्याहटवाThanks dear 😊🙏💕
हटवाJust you always Collaborate to me.. i will give... 💕🙏❣️❣️