★माणूसकीच्या शोधात★

लेखन : ओंकार जगदेव वाडकर

★ माणुसकी म्हणजे नेमकं काय....??

         आपण जन्मलो पण तेव्हा आपण कोण आहोत आणि आपल्या आजू बाजूला कोण आहे याचं काहीच भान आपल्याला नव्हतं. हळूहळू आपण मोठे झालो चालू लागलो बागडू लागलो, खेळू लागलो,रांगू लागलो घरच्यांचं बघून आपल्याला थोड्या फार प्रमाणात हालचाली कळायला लागल्या. पुढे आपण हे करु शकतो आपल्याला कुणी बोललं तर कुणी तरी आपली बाजू घेईल हा देखील अंदाज यायला लागला. कालांतराने आपण एक माणूस आहोत हे समजू लागले आत्ता मात्र माणूस म्हटलं तर थोडी फार माणूसकी आपल्याकडे असायलाच हवी ना.

            माणूसकीची पहिली पायरी सुरू होते ती आपल्या घरच्यांनी आपल्या आई वडिलांनी आपल्या संगोपनासाठी वाड- वाढीसाठी निःस्वार्थी पणाने केलेले प्रयत्न, अहोरात्र झालेली मेहनत, यात सुध्दा माणूसकी असते ना.. यात ही प्रेम आहे..!! थोडक्यात काय तर, “ माणूस म्हणून जगताना आपल्या अंगात कुणाविषयी तरी असणारा मदतीचा निःस्वार्थी ठेवा जो चिरकाल टिकणारा असावा ती म्हणजे माणुसकी... "

            एक प्रवास जगण्याचा अधिकार देवून जातो तर एक प्रवास माणूसकीच्या बिजाची अंकुर फुलवित जातो. वाटा अनेक असतात पण वाट कोणती निवडावी आणि पावलं कोणत्या गतीनं टाकावी हे परिस्थिती शिकवते. पण, ते शिकून घेण्याकरिता आपल्याकडे तेवढी माणूसकी जिवंत असायला हवी. कधी आपल्याकडे सर्व काही असेल तर त्याचा गर्व करण्यात काही अर्थ नाही कारण आपण काही वेळेपूर्ती मर्यादित राहणार आहोत आणि असं असलं ना तरी आपल्याकडे पैसा राहत नाही, धन दौलत तीच राहत नाही. कुठेतरी त्यात कमी जास्त होत असते आणि खऱ्या अर्थानं ईथे आपल्याकडे जर जपून ठेवली तर राहते ती आपली माणूसकी. माणुसकी जपणं हे एक कौशल्यच म्हणावं लागेल आणि ते कौशल्य आपल्या अंगी असेल ना तर जगात खरी श्रीमंती आणि सुंदरता ही नात्याची असते. जी माणुसकीच्या जोरावर आपल्या स्वभावावर सहजरीत्या मिळून जाते. ती अदृश्य असल्यामुळं आजच्या लोकांचा कल त्या मागे फारसा पहायला मिळत नाही.

★ ईतिहास काय सांगतो....??

                  भारत देश हा संस्कृती प्रधान, कृषिप्रधान, आणि परंपरागत चालत आलेल्या पद्धती जोपासणारा देश आहे. राजे महाराजे, ऋषी मुनी, विर सुपुत्र, यांचा ईतिहास पाहिला की तिथं सर्वप्रथम माणुसकी दिसून येते, प्रेम जिव्हाळा दिसून येतो. राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बाजीराव पेशवे, सावरकर, नेहरू, लोकमान्य टिळक, आगरकर, अगदी पुरातन काळापासून आपल्या लोकांसाठी समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा मनात अगदी पहिल्यापासून होती. जनतेला सोसावा लागणारा अन्याय, होणारी फसवणूक, आपल्याला हवं असणार स्वातंत्र्य या सर्व गोष्टी त्यांच्या अमाप प्रयत्नांनी मिळाल्या आणि आज आपण सर्व आनंदात राहतो. 

                  आपल्या भारताचा ईतिहास हा माणुसकीचा ही जतन करत आला होता. त्यांनी ही आपल्या डोळ्यांत, मनात हृदयात, माणुसकी, सर्वस्वी माणुसकी रुजवली होती. आणि त्यामुळेच त्या वेळी लोकांवर होणारे अन्याय हे त्यांनी निमूटपणे सहन करावं हे त्यांना मुळीच मान्य नव्हते. पण, ही माणुसकी काय व्यक्तीमध्ये नव्हती ती पशू, पक्षी, हा निसर्ग या सर्वांमध्ये होती. आज त्या ईतिहासाला रुजेल अशी तरी उरली आहे का..? हा प्रश्न थोडा खटकतो. आपण आदर्श ठेवू अस तरी काही उरलं आहे का..??

★ आत्ताच्या घडीला असणारी माणुसकी...

                    आत्ताच्या काळात माणूस माणसाच्या सोबत राहून सुद्धा काळाबरोबर पुढे चाललाय खरा पण, त्याच ओघात कुठे तरी लुप्त झालाय की ज्यामुळे आजच्या माणूसकीची मधुरता न राहता कुठे तरी हरवत चाललीय. दिवसा ढवळ्या माणसा माणसाची फसवणूक होतीय. आज एखाद्या मुलीला बाहेर मोकळ्या मनाने फिरणं ही कठीण बनलय. मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड या सर्वात माणूस माणूस म्हणून राहीला नाही. आजच्या घडीला ना शेजारधर्म आहे ना जिव्हाळा ना उरलं ते प्रेम ना उरला तो मदतीचा हात आज फक्त पैसा हा सर्व काही बनला आहे. पैसा हा एक जीवन जगण्यासाठी आवश्यक साधन आहे हे खरंय पण त्यानं सगळ्या गोष्टी विकत नाही घेता येत ना. आज ही माणुसकी संपली नाहीय पण ती लालचे पोटी थोडी हरवली आहे. 

                        आज अस वाटतं ना की भेटाव आणि खडखडून उठवावं की तिला एकत्र यायची वेळ आलीय. म्हटलं तर शोधायला जायचं खरंय पण काहींना भेटते तर काहींना भेटून सुद्धा न पाहिली ना ओळखली अस दिसतं. शक्य होईल तेवढी माणूसकी आत्ताच्या वेळी जपणं गरजेचं आहे. शक्य होईल तेवढी मदत एकमेकांस करण गरजेच आहे. हातानं हात धरून खचलेल्या व्यक्तीला उठवून सोबत चालणं गरजेचं आहे. विस्कटलेल्या मनाला आज मायेचं छप्पर मिळणं महत्त्वाचं आहे आणि हे केवळ माणुसकीने शक्य होईल. हरवली जाणारी प्रत्येक गोष्ट आपण शोधण्याचा प्रयत्न करतोच मग जर ही माणुसकी आणखी नजरेत आणण्याचा प्रयत्न केला तर उद्याला एक नवा आत्मविश्वास एक नवा भारत नजरेसमोर येऊ शकतो.

                         पुन्हा घडलेल्या ईतिहासाच जतन करून नवं अस्तित्त्व बनू शकेल. आणि खऱ्या अर्थानं माणुसकी हाच खरा धर्म आहे आणि तो चिरंतन आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल.

शेवटी अखेरच्या श्वासपर्यंत उरते ती माणुसकी...!! फक्त जगता आली पाहिजे...






 

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. खरच ह्या स्वार्थी जगात माणुसकी हरवत चालली आहे. समोरचा पाण्यासाठी तडफडत मरत असेल तरी कोणी विचारत नाही.
      माणुसकी हाच खरा धर्म आहे आपल्या भारताचा .
      Thanks a lot🙏🙏

      हटवा
    2. मनःपूर्वक धन्यवाद..!!
      आपण एक होऊन अर्थात वेगळ्या ठिकाणी राहत असू पण विचारानं एकत्र होऊन स्वतःशी प्रामाणिक राहून अशी प्रत्येकानं एकमेकांना मदत केली ना तर माणूसकी नक्की पून्ह्यांदा नव्यानं दिसेल..... आणि ती चिरकाल असायलाच हवी...

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

If you have any questions, doubts and want to information so plz let me know..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!