★ बाप
🖋️ लेखन : ओंकार जगदेव वाडकर बाबा म्हटलं तरं साहजिकच मुलांना भिती वाटते. हो मी सुध्दा एक बाप आहे. अहो म्हणून मी काही बाप म्हटलं तर रागीट अथवा निर्दयी नाही. माझं माझ्या लेकरांवर अफाट प्रेम असतं.पण ते प्रेम आजवर अदृश्य राहिलय ओ.कुठल्या बापाला वाटतं आपल्या मुलाला कुणी बेशिस्त म्हणावं आणि आपल्या मुलांना जबादारीपासून वंचित ठेवावं..!! असं, खरच कुणाला वाटतं का??अस आहे..!! कुठला बाप?? जो आपल्या मुलांकडून झालेल्या चुका चांगल्या म्हणून गप्प बसेल. असं, आहे का..? त्या चुका झाल्याचं तर साऱ्यांनी जे म्हंटल्यावर त्याला आनंद होईल. नाही ओ अस, मुळीच नाही. फक्त एवढंच वाटतं की माझ्या लेकरानी स्वतःचे भवितव्य धोक्यात टाकू नये. हा..! मी आई आईसारखा नसेन भोळसट, नसेन आई सारखा प्रेमळ, नसेन आई सारखा स्वभावानं अहो पण, ईतका ही वाईट नाही ओ मी. की माझ्याच मुलांनी माझ्याशी मोकळं होऊ नये जसे ते आपल्या आईजवळ राहतात. हा फक्त आईपेक्षा थोड्या जास्तच अपेक्षा ठेवतो म्हणा! त्या अपेक्षा म्हणजे मी माझ्या मुलांना स्वप्न बघण्यास तयार करत असतो ओ. माहिती नाही ते कुठपर्यंत बघतील मला पण, ती अपेक्षा माझ्या ना माझ्या पत्नीच्या मनात नसतेच आणि कधी ही येणार नाही. तेवढा सय्यम आमचा आमच्या मनावरती आहे.
बाबानं दोन रुपये दिले तर घेतले जातात पण त्या चिमुकल्या हातांनी भितीची लक्षण पांघरलेली असतात.मी असं नाही म्हणत हे सारं चुकीचं आहे. पण, एक प्रेमळ बाबा म्हणून जगण्यास मीच कुठे तरी कमी आहे. आईची रखुमाई झाली पण, बाबाचा विठ्ठल काही फार वेळा झाला नाही. आईची लक्ष्मी झाली पण,बाबाचा विष्णू कोणत्या घरामध्ये झाला आहे असं मला फारस आठवत नाही. बाबा आहे जबाबदारीचा खांब अन् ताण सहन करायला एक ताठर मान जी किती ही यातना झाल्या, किती ही दुःख असले, किती ही समस्या अधिक असल्या तरी चार लोकात उठताना बसताना ते सगळं शरीरातल्या जिथे जागा मिळेल तिथल्या एक पाझर न फुटणाऱ्या दगडा आड त्याला लपवाव लागतं. आणि सर्व बाबी विचारात घेता कायम आयुष्यात हसतच जगावं लागतं.
आईची मैत्रीण मुलगी होते पण, या रागीट स्वभावाचा, प्रेमळ मनाच्या बाबाचा मुलगा मित्र होत नाही. आत्ता यात मीच मैत्री करण्यास लायक नाही की, मुलाच्या मनात माझ्या बद्दल भिती अमाप असेल पण, माझ्या समोर प्रेम दाखवण्याची धमक नसावी. नेमकं काय असू शकते? सण वार आला की लगेच आपल्या आईजवळ मुलं बिलगतात. आणि हवं ही कारण तो आई सवेत आनंदाचा क्षण असतो पण, बाप ही तुमचा आनंद शोधतो आहे हे आजवर मी सांगण्यास असमर्थ का ठरलो आहे..?? हीच माझी सर्वात मोठी खंत आहे. मुलांना चांगल्या गोष्टी सांगण्या ऐवजी अभ्यास करा नाही तर मार मिळेल असं सरळ सांगतो.. अंधार पडायच्या आत तुम्ही घरी दिसायला हवेत.. असं ही सरळ सांगतो हे खरंय.. त्यात अस नाही की त्यात माझं प्रेमच नाही. की, त्यांच्या हसूची मला किंमतच नाही. किंमत तर खुप आहे आणि तितका अभिमान ही पण, काय करणार?? आजपावत हा बाप सर्व काही लपवायला शिकलाय ना... म्हणूनच, कदाचित ही अवस्था अनुभवायला मिळते.
हो.. असेन मी चिडखोर नाही होत ओ हा राग वेळेत अनावर.म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू उरलेच नाही अस तर नाही ना..!!मुलांनी माझ्याशी काही मांगाव आणि मी ते देऊ नये असं तरं नाहीच आणि ते मोठे उपकार ही नाहीत उलट माझंच कर्तव्य आहे ते, मला पार पाडायला हवच. आईला चुकलेली गणित समजू शकतात पण, या बाबा ला का नाही ?? मला सुद्धा वाटतं माझ्या मुलांनी माझ्याकडे गुपचूप चॉकलेट खायला पैसे मागावे. पण तो क्षण फारसा ही येत नाही आणि आलाच तर हा बाबा तापट डोक्याचा असतोच तेव्हा मात्र पटकन चिडून जातो तीच भिती माझ्याच लेकरांच्या मनात कायम राहते. माझा साज शृंगार नसावा पण, माझ्या जीवांचा माझ्या सोबतीचा कायम साज शृंगार असावा हेच मला वाटतं. साज शृंगाराचं काय आहे म्हणा! एक शर्ट पँट चढवली की माझा ही होतोच. माझ्या कुटुंबात कायम आनंदान वास्तव करावं, कायम सुख खेळतं राहावं हीच त्या भगवंताकडे प्रार्थना असते माझी अन् कायम त्यासाठी अहोरात्र मेहनत करावी आनंद सुख कायम टिकवून ठेवायचं या साठी झटत असतो. मुलं कधी तरी आई, आज्जी आजोबा यांच्या सोबत खारे चणे शेंगदाणेखायला तयार होतात पण काही वेळा हा बाप मात्र डावलला जातो. बाबा... तुमच्याकडे चिडण्याशिवाय काही नसतंच का..? याचं उत्तर माझ्या लेकराला कसं देणार की हे म्हणणं सोपं आहे पण, बाप म्हणून जगणं वागणं खुप कठीण आहे. ही माझी मीच मानहानी करतो अस होईल नाही का..?? आणि बाप सारं मनात डांबून, हसऱ्या चेहऱ्याने जगायचं हेच लक्षात ठेवतो. आत्ता नेहमीचं उदाहरण बघा ना. ठेच लागली की आई....!!! पटकन म्हणतो आपण. पण बाबा त्या उच्चाराच्या ही कामी येत नाही.. त्यातून ही तो गजाआड असतो.
मुलीचा प्रेम अस दुसऱ्या घरी लोटण म्हणजे मीच माझ्या पायावर घातलेली कुऱ्हाड..!! या वेदना काय असतात त्या फक्त एका बापाला आणि त्या जन्म देणाऱ्या मातेला कळू शकतात. पण ते ही दुःख क्षणार्धात चपळाई लपवून टाकतो आणि मुलीला हसत मिठीत घेतो. हो पुढे मी सरत्या वयात आहे होत असेल माझी चिडचिडकाय करणार सरत वय आहे वाटायचंचं... पण, माझ्याच मुलांनी मला म्हणावं..!! बाबा..!! काय हे ? आत्ता तरी शांत रहा. एवढा मी कम नशिबी..! आणि सूनेकडून ऐकावं काय बाबा..?? कशाला जाताय तिथे पडलात तर उगाच तुमची नुकसानी कशाला..?? आणि हां मी ही अशक्त..!! पण, कसं सांगणार की, आजवर या बापानं ज्या खचका खाल्ल्या त्या अशा एकटेपणात बोचायला उटतात,त्रास देतात.मनानं खरं तरं जिथं मोकळं व्हायला हवं होतं तिथं नाही झालो.पण, आज वाटतंय मोकळं व्हावं...!! अखेर सरली वेळ सरला काळ असं म्हणून गप्प बसावं लागतं.
शेवटी मरे पर्यंत कळत नाही की, हा बाबा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सोडला तर उरतो तरी कुठे...???
फक्त नावाला मात्र उरतो तो बाप...!!!
👌👌👍👍♥️
उत्तर द्याहटवाThank you ☺️
हटवाMst
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा