★  थोड  काही 

तिच्याविषयी......

  
                    लेखन : ओंकार जगदेव वाडकर

राम राम मंडळी....

                 हा एक माझा लेख आहे. जो वाचून तुम्हाला नक्की आवडेल.कारण आपला विषय हा बहुतांश लोकांना आवडणारा आहे. "थोडं काही तिच्याविषयी......" चला मग एक साध्या शब्दात व्यक्त केलेल्या लेखाची सुरुवात करुया... तिच्या विषयी म्हटलं तर, एका स्त्री विषयक माहिती या लेखणी तून  स्पष्ट होईल. आत्ता हेच बघा ना माझी लेखणीसुद्धा ' ती ' च आहे आणि तिच्याविषयी सुद्धा असेल असं काहींना वाटेल किंवा कुणा आवडणाऱ्या मुलीविषयी असू शकते असे सुद्धा वाटेल. तस ईथे काही एक नसणार आहे. आज प्रत्येक ठिकाणी तिच्याशिवाय जगण्याची कुणाची ही हिम्मत नसेल, काहींना जगावं लागतं पण तो नशिबाचा भाग असतो. असं म्हणून त्यांनाही त्यांच्या आयुष्यात पुढे चालाव लागतं. जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर आपल्याला लहानपणापासून शांत झोप लागते. आणि हे थोड काही तिच्याविषयी अर्थातच आपली आई...!!!!
          आईच अस्तित्व तिची जीवन गाथा या साध्या शब्दात रेखाटण, व्यक्त होणं कठीण आहे. पण येवढं कठीण नाही की आपल्या विचारांना बाजूला सारून ते फक्त नजरेनं पाहत रहावं... साऱ्यांना वाटतं आपले आई वडील आणि आपण कायम सुखी राहावं अन आपल्या आईला खूप खूप सुखी ठेवावं. हा एक विचार बालपणातील होता, जो आज खऱ्या अर्थानं उत्तरानीशी राहिलेला नाही. आई विषयी खूप सांगता येईल,आई हे एक आधार आपल्या परिवाराचा आणि कणा आपल्या समाजाचा आहे. ती जेव्हा स्वयंपाक घरात असते आणि बाहेर खोलीत बसलो असतो तर, तिच्या त्या स्वयंपाकाचा ओटा पूर्ण भरलेला असतो आणि तिथून आपल्या थेट नाकात शिरणारा तो सुगंध. तीन भाजी जरी मसाला घालून केली असली तरी तो वास गोडवाच निर्माण करतो. अन्नाला चव तेव्हाच येते जेव्हा आई तिच्या हाताने बनवते. आईच्या पदराआड राहून जेव्हा लहानपणी हट्ट करत होतो की मला माझ्या आवडीच बनवून दे. आणि आई एका क्षणात आपल्याला बनवून द्यायची.पहिलं आई आपल्या भुकेची काळजी करायची आणि आपल्याला चार घास मागे लागून लागून भरवायची आणि नंतरच ती स्वतः दोन घास धावत पळत खायची. आई म्हणजे विहीर अशी असते जी मायेच्या स्वच्छ पाण्याने सदैव तुडूंब भरलेली असते. ती आपल्यासाठी येवढं काही करते पण, आपण काही तिच्याविषयी चांगलं बोलावं, तिच्यासाठी चांगलं करावं याची काडीची अपेक्षा ठेवत नाही.
               आई किती काबाड कष्ट करते ना, ज्याची आपल्याला किंमत शून्य मात्र कळत नाही. कारण तसा आपण विचारच करत नाही. ती स्वतःचा आनंद बाजूला ठेऊन दुसऱ्यांसाठी अर्थात आपल्या कुटुंबासाठी जगत असते. सर्व गाढ झोपी जरी गेले तरी तिची धावपळ असते ती म्हणजे उद्याच्या नियोजनासाठी, उद्याच्या स्वयंपाकासाठी. आपण एक ऑफिस काम कुठे करतो तर घरी येई पर्यंत अगदी थकून जातो, कंटाळवाणे होऊन बसतो. तिला सर्वांच्या आवडी निवडी माहिती असतात पण तिच्या आवडी निवडी कुणाला माहिती असतात का....??? असल्या तरी सहजच विसरून जातात.. कारण, आपण ऑफिस काम करतो ना, आणि ते ही घरा बाहेर.... आणि आई तर घरी असते तिच्याविषयी येवढं काय आहे म्हणा...!!!! असच वाटणार ना... पण, आईच्या त्या मनावर कधी नजर टाकलेय का..? जे कायम दुसऱ्यांना हसवत असतं. आणि स्वतःचं आयुष्य संपूर्ण स्वयंपाक घरात झोकून देते आणि त्यातच ते पुर विश्व मानते... आई अन्नपूर्णा देवी असते जी भूक क्षमवते. आणि स्वयंपाक घर हे जगच नाही तर संपूर्ण ब्रम्हांड असतं अस, मला तरी वाटतं. हे केवळ तिच्यासाठीच नाही तर संपूर्ण मनुष्य जातीसाठी ब्रम्हांड आहे. ती घरी असताना घरचं वातावरण हसत खेळत मनमिळाऊ राहतं हे केवळ त्या आईच्या प्रेमाची सावली त्या घरच्या चार भिंतींवर पडलेली असते आणि या भिंतिंनाही तिचीच सवय होऊन गेलेली असते. तिची माया आपल्यावरच नसते तर घरातील कानाकोपऱ्यात तिच्या प्रेमाचं नातं सहज दिसून येत. असं म्हणतात घराला घरपण येतं ते केवळ त्या आईमुळे मग हिच आधी कुणाची मुलगी असेल तर कुणाची बहिण... स्त्री ही दोन घरातील नात जीवनभर विश्वासाने जपून ठेवण्यासाठी वचन बद्घ असते. या सर्व वाचनाच्या गोष्टी तीन स्वतःच्या मनाला लग्नापूर्वीच समजवलेल्या असतात. बघा ना, किती अगणित समजूतदार पणा आहे तिच्याकडे, आपण जर तिला कोणत्या कामात मदत करायला गेलो तर आपल्याला थोड्या वेळानं कंटाळा येतो पण ती तीच कामं हजारवेळा करते तिला कंटाळा येत नसेल का..?? एक कृती नक्की करा... आई जेवण बनवत असताना तिथे जाऊन बघा तुम्हाला नक्की त्या मासालाचा ठसका जाईल आणि हे सामान्य आहे जे सर्व अनुभवत असतात. ती आपल्याला कधी तरी चुलीवर असलेल्या पातेलीच झाकण बाजूला करायला सांगते आपण ते पकड घेऊन करतो पण तरीही कधी तरी आपला हात पोळतो मग विचार करा ती सहज हातान बाजूला करते तर, तिच्या वेदना काय असतील... पण, तिच्याकडून त्या वेळी वेदनेचा व...!!! देखील उद्गारला जात नाही.
        " स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी " आपण किती ही श्रीमंत असू द्या पण, त्या श्रीमंतीला आईच्या आशीर्वादाने बहर येतो. मुलगा आपल्याबद्दल किती जरी निष्काळजी वागला ना तरी सुद्धा ती त्यावर तेच प्रेम करते जी आजवर करत आली होती. स्वतःचं दुखणं विसरून जाणारी आई आपल्या मुलांची दुखणी वेदना चेहऱ्यात ओळखून जाते आणि म्हणते, बाळा तुला काही होतंय का...!!!! हे केवळ आईच समजू शकते. आपल्याला काही लागलं तर आई गं.....!!!! असं आपण सहजच उद्गारतो कारण त्या प्रत्येक वेदना कमी करण्यासाठी त्या पचवण्यासाठी देवानं दिलेलं ते पहिलं न कळणार औषध असत, जे कुठे ही मिळत नाही ते फक्त ऐकू येत ते म्हणजे आई.....!!! तिच्याविषयी येवढं. सर्व आपण विसरून जातो तिची आवड, निवड, तीच समाधान, तिचा आराम, आणि सर्वात महत्त्वाचं तिचं मन जपणं सुद्धा विसरून जातो. तिच्याविषयी काही बोलताना मला साध्या सरळ शब्दात नक्की मांडायला आवडेल......
           आई तुज कसे मी वर्णवू
           तूच आहेच सर्व काही मी कस तुला विसरु 
           स्व आवडीचा तो वाटा स्वतःचं विसरुनी जाते 
           तुझ्या पदराच ते सुख आत्ता ही मिळते
           मायेचा तुझ अतूट हे पतंग 
           ऊंच ऊंच भरारी घेऊनी जाते
           अन् तुझ्या प्रेमाची ती किंमत 
           तुझ्या ओघळत्या अश्रूंनी कळते
           होऊनी त्या वेदना शरीरात 
           साऱ्यांच्या नजरेतून तू लपविते
           तरी मात्र सैदव स्वतःच्या 
           चेहऱ्यावर तू हसू ठेवते
           कौटुंबिक समस्येची कठीण 
           ढाल होऊनी तू जगते
           कोसळला जरी दुःखाचा डोंगर
           तो स्वतःवरच तू झेलते
           परिस्थितीशी दोन हात करणं
           तुला सहज शक्य होते
           आई तुझं कौतुक करण्या
           शब्दतही अश्रू धारा येते....
           शब्दातही अश्रू धारा येते....
         मग, तिच्याविषयी येवढं सगळं कधी आपण विचार केला का....??? कारण आई ही आई असते जीला साक्षात परमेश्वर सुद्धा तिच्या चरणी विलीन होतो. तिच्याविषयी काही शब्दात सांगणं खुपचं अवघड आहे. पण आपल्या आईची ही धावपळ आज साध्या शब्दात शब्दात व्यक्त करावीशी वाटली. आणि म्हणूनच, " थोडं काही तिच्याविषयी " शब्दात मांडावस वाटल....
    
 

            
      

टिप्पण्या

  1. जिच्या मध्ये ईश्वरी आत्मा वास करत आहे ती म्हणजे आई. तुम्ही फक्त तिची जीवन कहाणी नाही मांडली तर ती डोळ्या समोर उभी केली. ते बालपणीचे दिवस आठवले तिच्या जवळ धरलेला हट्ट आठवला आणि तिच्या विषयीची जबाबदारी देखील उमजली.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

If you have any questions, doubts and want to information so plz let me know..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★