आपलं हक्काचं जन्मघर....आपलं गाव....


★ गावची सफर....!! 
                    
                     🖋️ ओंकार जगदेव वाडकर

                       सकाळची कोवळी सोनेरी किरणं जेव्हा दाट झाडीतून डोंगरातून मान वर डोकवतात ते ठिकाण म्हणजे गाव.जिथं पशू पक्षी ही अगदी निर्भिड पणे त्यांचा किलबिलाट डोंगरात घुमवत असतात ते म्हणजे गाव.जिथं वडाच्या झाडाखाली अथवा शेजारच्या कट्ट्यावर पान खात गप्पा मारत बसण्याची रंगत मैफिल पाहायला मिळण्याच ठिकाण म्हणजे गाव. शेजारधर्म हाच खरा ईथे जात आणि धर्म यांच्यात समन्वय साधतो. असं हे सर्वांचं आपलेसे करणारं, आज नावारूपाला असणार ठिकाण म्हणजे गाव. 
                           किती छान वाटतं ना जेव्हा कुठे तो धुक्याचा थाट सर्वत्र पसरून क्षणात लक्ष वेधतो.इथली संस्कृती ही इथल्या अस्तित्वाची खरी ओळख असते. कधी फेर फटका मारायचा झालाच तर एकाच्या चुलीजवळ गेल्यावर दुसऱ्याच्या ताटातली भाकरी दिसते. हे खरं तरं गावच प्रेम आहे तेवढा जिव्हाळा आज ही आहेच. एक वेळ अशी होती की पैसा सोई सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हत्या खऱ्या पण गावची चिरकाल स्मरणात राहणारी माणुसकी मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. ज्यांनी ज्यांनी गाव पाहिला गावच अस्तित्त्व जगले ते ते धन्य झाले. 
                         कधी कुणावर प्रेम तर कधी कुणावर रुसण, वाद विवाद हे तर होतच राहतात. पण त्यानंतर ही इथे पाहायला मिळतं ते प्रेम. कधी कुणाच्या आनंदात तिसऱ्याला सामावून घेतलं जातं तर दुःखात सहभागी होऊन त्यांचं सांत्वन केलं जातं. कधी विकासाठी नवनवीन संकल्पना मांडल्या जातात तर कधी मनोरंजनासाठी तितकेच आवश्यक असे उपक्रम राबविले जातात. लहानग्याना ही थोडा आनंद मिळावा सहभाग घेता यावा यात ही मागे नसणार ठिकाण म्हणजे गाव. ज्ञान, ईतिहास, जिवंत ठेवण्यासाठी तिथं प्रत्येकाला आपुलकी असते. कुणाला नाही आवडणार आपल्या गावची सफर करायला. गाव किती जरी डोंगर दऱ्यात वसलेलं असलं ना तरी प्रत्येकाची ती मायेची सावली, आठवणींची ओंजळ, आणि भूतकाळातील शिदोरी असते की तिच्या जोरावर आपण पुढे जात असतो. सणासुदीत एकमेकांना आधार देण, सहाय्य करणं ही सुद्धा गावची खरी ओळख आहे. नागमोडी वळणं जेव्हा पाऊल पार करतात तेव्हा तिथं गारवा आपसूकच जाणवू लागतो ते चेहऱ्यावरचं हसू हे सर्व गावच्या हद्दीत पोहचल्यावर त्या मायेनं सर्वत्र पसरलेल असत. प्रत्येक मोसमात ईथल वातावरण बदलत खरं पण तितकाच जास्त आनंद ही असतो हसती खेळती हवा असते. साफ स्वच्छ मऊसर अशा सर्वत्र पसरून आभाळाकडे डोकावणाऱ्या गवत वेली असतात. वाहणारं झुळ झुळ पाणी अगदी काचेप्रमाण असतं. शाळेचा घंटानाद हा सुध्दा कानी घट्ट पकड घेऊन बसलेला असतो. तिथल्या कवायतीचा घुमत असतो अभ्यासाची धावपळ प्रत्येकाला शिकवत असते. 
                        ऊंच कड्यावर जाऊन बोलणं म्हणजे ‘इको माईक' मध्ये बोलल्यासारख आहे. आज ही प्रत्येकाला वाटतं गावी जावं, मनसोक्त आनंद लुटावा, फिरावं चार दिवस सुखाने जगावे कारण आपल्या श्वासात, नसानसात जिथली माया, प्रेम, जिव्हाळा, माणुसकी भिनलेली असते ते ठिकाण म्हणजे आपल गावं...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

If you have any questions, doubts and want to information so plz let me know..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★