आईचं पत्र हरवलं....!!
🖋️ लेखन - ओंकार जगदेव वाडकर
एक वेळ होती जिथं नात्यांचा एकोपा जपून ठेवला जात असे. त्या काळी सामाजिक माध्यमे ही फारशा प्रमाणात नसायची पण तरी ही एखाद्याची मनापासून ओढ लागायची. त्या वेळी दरवाजावर आलेला पोस्टमन पाहताच माणस ओळखून जायची काही तरी बातमी आलीय आणि दुःख असो अथवा सुख प्रत्येकजण एकमेकांना आधार देत असे. चार शब्द भेटून बोलणं अथवा या शब्दातून बोलणं या साऱ्यांची त्या क्षणी नवलच वाटायची. कारण तेव्हा माणसाकडे वेळ ही मुबलक असायचा आणि माणसंही जोडली जायची.
पत्राद्वारे केली जाणारी चौकशी यात ही प्रेम होत. लहानपणी एक खेळ खेळला जायचा ‘ आईच पत्र हरवल ते मला सापडलं ’ किती तरी मोठ्या प्रमाणावर आनंद देऊन जायचा आणि आज ही ती आठवण क्षणात डोळ्यासमोर उभा करून जातो असा हा खेळ होता. संपूर्ण बिनखर्चिक, कमी संख्येत अथवा जास्त संख्येत, जास्त धावपळ न करता, मोठ्या प्रमाणावर खेळला जायचा. काही सवंगडी खाली जमिनीवर वर्तुळाकार पद्धतीनं बसून एक सवंगड्याने ऊभा राहून त्या वर्तुळाभोवती फिरायच आणि बसलेल्या सवंगडीपैकी एकाच्या मागे रुमाल अथवा ती हातातली एखादी वस्तू टाकून पुढे जायचं आणि त्यास समजलं की त्यानं आपल्याला पकड करायच्या आतच आपण त्याच्या जागेवर जाऊन बसायचं. अशी सरळशी या खेळाची रूपरेषा आहे त्या काळी खूप प्रचलित असा हा खेळ होता. जो लहानग्यांना खेळायचा मोह करीत असे. किती निखळ, करमणूक, आणि मनमुराद आस्वाद घेता यायचा आणि या खेळाबद्दल प्रत्येकाला आपुलकी ही तितकीच होती. कालांतराने दिवसामागून दिवस गेले, वेळ लोटला काळ गेला अन् आज ला हे पत्र रुपी खेळाच स्वरूप खऱ्या अर्थानं गहाळ झाल्यासारख वाटतंय.
कुठे तरी कुणी तरी दूरवर जाऊन कायमच ठाण मांडलं आणि ते परत येऊच शकणार नाही अशी ही या खेळाची गोष्ट आहे. त्या वेळी मध्यम वर्गाला सुद्धा पत्रचाच आधार होता. आणि पत्र लेखन म्हटलं तर जंगी शर्यत होऊन जायची कोण अगदी उत्तम रित्या पत्र लेखन करत हे सुद्धा पाहिलं जायचं. हे शब्द आहेत खरे की,
“ माझ्या आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं ” पण, आज हे शब्दच नाहीय तर तो खेळ ही अदृश्य झालाय आणि अदृश्य झालेत ते पत्रव्यवहार. पूर्वीच्या काळी मुलगी पसंद आहे अथवा पसंद नाही हे सुद्धा पत्राद्वारे कळविले जायचे. त्यावेळी फोन आणि त्यांचा वापर ईतका काही नव्हता त्यावेळी साधा फोन असण म्हणजे एक मोठी श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तीच नाही का...? आज ते शब्द सुद्धा ओठांवर येणं जड जातात मग तो खेळ खेळणं ही तर दूरची गोष्ट आहे. आणि त्या वेळी पत्रात कशा प्रकारचे शब्द रचना करावी कोणता मजकूर जास्त गृहीत धरला जातो आदी साऱ्या गोष्टी त्यावेळचे लोक बारकाईने तपासून घ्यायचे. आज ला हेच पत्र जर कोणा एकास लिहायला म्हटलं तर चाचपडत उठताना दिसते ती हातातली लेखणी अन् चेहऱ्यावर शंभर विचारांचा पेच चेहऱ्यावर पडताना दिसतो.
मध्यम घरात ही या खेळाची आणि त्या पत्र लेखन वृत्तीची कदर केली जायची. आज त्याचा किंचित ही कण उरलेला नाहीय. स्वातंत्र्य पूर्व काळात ही पत्राचा खुप उपयोग केला जात होता. खरं तर, त्या काळात शिक्षणाची एवढी आवड नव्हती जेवढी आत्ता आहे आणि आजच्या घडीला ही एक काळाची गरज बनली आहे. पण ज्या गरजा आधी होत्या त्या, ज्यातून माणसाला अल्पसंख्यांक विकास होता त्याच गोष्टी आजला या पूर्णत्वाच्या मार्गावर काळाप्रमाणे मागेच राहिल्या सारखं वाटतंय. आज बालवाडी अंगणवाडी आहे पण, माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं हे कानावर पडणारे शब्दच राहिले नाहीत. आज पोस्ट ऑफिस आहे पण त्यात टपाल पेटीमध्ये त्याप्रमाणात अशी पत्रच पडत नाहीय. आज पोस्टमन ही आहेच पण त्याच्या सायकलची घंटी आणि आणि त्याच्या हातात असणारा पत्रांचा संग्रह आजला नाहीसा झाला आहे. तो पात्रांच्या गट्ट्यातून काढलेलं एखाद आनंदाची बातमी देणारं पत्र कधी तरी मन लाऊन वाचणं हे सुद्धा एका कचरा पेटी मध्ये गुडूप झाल्यासारखच आहे.
आधी म्हटलं जायचं ‘आईचं पत्र हरवलं...’त्याला उत्तर ही होत ‘ते मला सापडलं’ पण, आत्ता मात्र तसं नाहीय आत्ता ते भेटेल का नाही भेटणार हे ही कुणाला नाही सांगता येणार. आत्ता फक्तं एवढंच म्हणावं लागेल की,
“ आईचं पत्र हरवलं.....!! ”
Nice
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद..!!
हटवाSo Nice Broo😊👌👌
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद..!!
हटवा😀🤗😍😘
उत्तर द्याहटवामन:पूर्वक धन्यवाद..!!
हटवाNadach nahi bhava😎😍😘
हटवाधन्यवाद दादा..🙏😊
हटवाउत्कृष्ठ लेख संग्रह ❤️❤️❤️
उत्तर द्याहटवामनःपुर्वक आभार
हटवाउत्कृष्ठ लेख संग्रह ❤️❤️❤️
उत्तर द्याहटवा❣️😊🙏
हटवाKeep it up bro
उत्तर द्याहटवाDefinitely dear ☺️❤️
हटवाAnd thanks 😊