★कंकोत्री....


             आयुष्यात प्रत्येकाला कुणाचा ना कुणाचा सोबती होऊन आयुष्याचा साथीदार बनून जगावं लागत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या साथीदाराच्या संमतीने आयुष्य जगण्यात आनंदच वाटतो की आपला हक्काचा चेहरा कधीही आपल्यासाठी तयार असेल. मला ही असच वाटतं असावं कुणी तरी आपल्यासाठी खास, विश्वास जपणार, आपलंसं करणार अस कुणीतरी जी इथून थेट कंकोत्री पर्यंत साथ देणारी असावी. ऐकायला शब्द नवा वाटतो ना.. कंकोत्री म्हणजे मला ही नवीनच होती ज्याला आपण लग्न पत्रिका म्हणतो. जिच्या आधारे आपल्याला थोरा मोठ्यांचे, नातेवाईकांचे, आशीर्वाद आणि उपस्थिती कायम मिळते. जिच्या प्रथम पानी गजाननाचे नावारूपी दर्शन होते.
            आज अनेक चेहरे आहेत अनेक व्यक्ती आहेत ज्या केवळ या कंकोत्री आधारे साथीदार बनून खऱ्या अर्थानं आयुष्याचे भागीदार बनतात. कंकोत्री असली की, एक ठोस पाऊल असते जे सर्वानुमते मंजूर करून प्रत्येकाचं शुभमंगल सावधान होणारच असत. काही वर्षांच्या अवधीनंतर आज मला सुद्धा तुझं नाव त्या कंकोत्री मध्ये पहायचं आहे. दोघांना एकत्र यायला तोच खरा मदतीचा हात असेल जो सर्वांना मान्य असेल. ताल तो सूर तो रस कानाकोपऱ्यात पोहोचवायला तिचा मोलाचा हातभार असतो. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या या हर्षात स्वतःला न्याहळायचा आनंद ही वेगळाच असतो. चारही बाजूला अक्षतांचा साज असतो, मंगलाष्टके कानी पडतात, सनई चौघडा तालासुरात असतात सगळं काही त्या कंकोत्रीद्वारे ठरलेल्या नियोजनाने घडत असतं. ती धावपळ, तो साज साजेरा हा त्या विवाहित जोडप्याला आपुलकी आणि जिव्हाळा नक्कीच दाखवून देतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक कंकोत्री खुप काही घडवून जाते. प्रत्येकाचं व्यक्तित्व एक नव्या आणि वेगळ्या टप्प्यावर नेऊन जाते ती ही  ‘कंकोत्री ’.

                ✍️ लेखन : ओंकार जगदेव वाडकर
                      संगमेश्वर, रत्नागिरी
                    भ्रमणध्वनी : ७२१९४३२७०६

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

If you have any questions, doubts and want to information so plz let me know..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★