★प्रेरणादायी विचार..
★ नकारात्मक विचारातून सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करावी...?
मित्रांनो आयुष्य आहे म्हटल्यावर झटपट ही होणारच ना. जिथं संघर्ष नाही तिथं आनंदाला उधाण नाही. अगदीच आनंद सुख नसतं असं काही नसतं. पण, खरा आनंद तर तेव्हा असतो जेव्हा आपण आपली स्वप्न येणाऱ्या अडचणी संकटे यांवर मात करून मोठ्या धैर्याने सामोरे जातो आणि पुढे वाटचाल करतो. हे आयुष्य आपले आहे तर विचार आणि त्या विचारसरणीला एक मार्गदर्शक असणं ही गरजेचं असत.
आपण जर बोलके नाही झालो तर आपले विचार आपले भाव हालचाल समोरच्या व्यक्तीला समजणं कठीण असतं. पण, काही वेळा असं होताना जास्त निदर्शनात येतं की, कोणत्याही गोष्टीचा अती विचार हा नकारात्मक दृष्टिकोन तयार करतो आणि कमजोर बनवतो. कमजोरी ही खरी ताकद असते की, तिच्या जोरावर मोठ्या धैर्याने आणि सहनशीलतेने उभे राहून आपली दिशा आपल्याला ओळखायची असते. निसर्गाची चक्रे अशी आहेत की दिवस मागून रात्र, आठवडे मागून महिने आणि महिन्यांमागून वर्ष लोटली जातात. प्रत्येकाला स्वतः मध्ये एक सकारात्मक बदल करता येणं ही एक काळाची गरज आहे आणि तशी प्रत्येकाची पाऊले ही असायला हवी.
नकारात्मक विचार :
ही एक अशी गोष्ट आहे ना की मी मी म्हणणारे सुद्धा यात कुचकामी ठरतात. एक विचार माणसाचं जीवन बदलू शकतो तर तोच विचार त्या माणसाचं जीवन उद्ध्वस्त ही करू शकतो. अशा वेळी आपण आपला दृष्टीकोन कशा पद्धतीचा ठेवतो हे जास्त महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट मनावेगळी घडली, आयुष्यात होणारे अनपेक्षित बदल, काही स्वभाव जे बदलायचे असतात. माझ्या मते काही मुख्य कारण असतात जे नकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यास मदत करतात.
१) अनपेक्षित बदल
२) जवळच्या व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद
३) परिस्थितीत ढासळणारा आत्मविश्वास
४) स्वतःविषयी जास्त विचार करून मनाला दुर्बल करणे
या सामान्य गोष्टी आहेत ज्या सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात घडत असतात. म्हणून खचून जाणे यावरचा उपाय नसतो तर आपल्याला स्वतःला सुद्धा करण्याची आणखी मिळालेली एक नवी संधी असते. अशा वेळी स्वतःला एकांतात कधीच ठेवू नये. अशा ठिकाणी स्वतःला गुंतवा की जिथून तुम्हाला आनंद मिळेल. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तरबेज होऊन नवी ऊर्जा तयार करा की नकारात्मक विचार मनात येताच ते अगदी क्षुल्लक वाटू लागतील. ज्यात तुम्हाला रस आहे ती गोष्ट करा. ज्यातून तूम्ही यश नक्की मिळवू शकता एक चांगलं नावलौकिक प्राप्त होईल अशी गोष्ट मग तो तुमचा छंद असेल, अभ्यास असेल अथवा अन्य गोष्ट असेल.
_त्यावर सहकाऱ्यांची, कुटुंब वासियांशी चर्चा करा. त्याचं थोड थोड ज्ञान घेत पुढे व्हा.
_मुख्य म्हणजे घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन आपल्याकडे असायला हवा.
_स्वतःला त्या छोट्या छोट्या बदलातून प्रेरीत करा.
_रोज एक नवी संधी शोधा ज्याच तुम्हाला सोन करता येईल.
_आपणा सर्वांना माहिती आहे यश कोणालाही एका रात्रीत अथवा दोन चार महिन्यांच्या कालावधीत मिळत नाही.
त्यासाठी कसून मेहनत घेतली जाते जी प्रयत्नातून आपल्याला यशाकडे नक्की पोहचवते. रोज एक नवी अशी गोष्ट शोधा की त्यातून तुम्हाला शिकता येईल. प्रत्येकाला मदतीचा हात पुढे ठेवून मनाला जास्तीत जास्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वात मोठं कारण म्हणजे अपेक्षा
माणूस म्हटलं की याचं ओझं प्रत्येकावर कुठून ना कुठून लादल जातच. पण आपल्याला हे ही समजायला हवं की जास्तीच्या अपेक्षा मनाची प्रवृत्ती बिघडवतात अशा वेळी सुद्धा अनेक जण चुकीची पाऊले उचलतात.
लक्षात ठेवा संकटे त्यांनाच येतात ज्यांना खरच काही तरी करायचं असतं. येणारी संकटे, येणारे नकारात्मक विचार हे आपल्याला बिघडवायला मुळीच येत नसतात.खरं तर ती एक अशी वेळ असते जी आपल्याला आपल्यातलं बी ओळखून त्याला घडवायची खरी संधी असते. स्वतःच्या मनाला ताकीद करा की तू नकारात्मक विचारातून खचू नको मी आहे तयार सर्व झेलायला फक्त तू खचू नको. बघा तर नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल आणि सकारात्मक ऊर्जा अंतर्मनात हळूहळू जाणवू लागेल. कोणती ही चांगली गोष्ट घडायला वेळ लागतो आणि ते टिकवून ठेवायला सय्यम असावा लागतो. कारण सय्यम ही अशी गोष्ट आहे ना की तो जर ठेवलात तर आज ही जातील काही दिवस पण एक दिवस तुमच्या यशाचा सूर्योदय नक्कीच झालेला असेल.फक्त विचार सकारात्मक ठेवा प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक नजरेनं पाहा.येणारी प्रत्येक वेळ ही सकारात्मक होऊन जाईल आणि सगळं काही बदलून जाईल.
लेखन : ओंकार जगदेव वाडकर
संगमेश्वर, रत्नागिरी
भ्रमणध्वनी : ७२१९४३२७०६
खूप छान 😍👌, आणि अतिशय प्रेरणात्मक लिखाण 😊👍
उत्तर द्याहटवामनःपुर्वक धन्यवाद..🙏😊❣️
हटवाNice 🙏🙏
उत्तर द्याहटवामनस्वी आभार...🙏😊❣️
हटवा