★ प्रेरणादायी विचार

 



★ मनाची शांती कशी शोधावी अथवा मन एकाग्र कसे करावे


            मन हे खुप मोठा आधार असतो तो आपल्या शरीराचा आपल्या मानसिकतेचा. मनाला शांत आणि एकाग्र ठेवण्याचा अनेक जण आपल्या आपल्या परीनं अथक प्रयत्न करतात. पण, यश यात त्यांनाच येते जे जोमान या गोष्टीचा पाठपुरावा करतात. कारण स्वप्नाचा पाठलाग करताना आणि आपले दैनंदिन जीवन जगताना आपल्याला मन शांत ठेवावं लागतं. मनाची शांती पूर्णपणे कधीच अस्तित्वात नसते मन बऱ्याचदा या गोष्टीवरून त्या गोष्टीवर फिरकत असते हा प्रवास कायम चालूच असतो. ठरवलेल्या कामामध्ये फक्तं काही क्षण फक्तं शांती मिळते आणि घेता सुद्धा येते पण अखेर तीच परिस्थिती येते की मनाला एकाग्र करण प्रत्येकाला कठीण असतं.

               मन हे एक अधिकार गाजविणारा आपल्या शरीरातला असा अवयव आहे की, जो आपल्याला सत्कर्म आणि कुकर्म करायला भाग पाडतो. हे तेव्हाच शक्य होत जेव्हा आपण मनाच्या आहारी जातो. एखादी गोष्ट मिळावी म्हणून लालची बनतो. राग, क्रोध, मोह, मत्सर आणि माया ही पंचद्रिये आहेत जे मनाला शांत निखळ प्रवाहातून बाहेर खेचून त्सुनामी निर्माण करतात. 

              जर आपल्याला शांततापूर्ण आयुष्य आणि सकारात्मक ऊर्जा आत्मसात करायची असेल तर मनाला आपल्या ताब्यात ठेवणं सर्वात जास्तं महत्त्वाचं असतं.अशा वेळी तुम्ही जो विचार कराल त्याची आज्ञा म्हणून कार्य करण मनाची तयारी असते. पण, जर आपण स्वतःला मनाच्या स्वाधीन केलं तर आपण आयुष्यभरासाठी स्वतःला मोठ्या संकटात टाकणार असतो. 

                       


           भगवान श्रकृष्णांनी सुद्धा अर्जूनौपदेश करताना म्हटलं आहे की, हे मानवी शरीर  एका रथाप्रमाणे आहे. या रथाचे जे घोडे आहेत ये म्हणजे आपली शारीरिक इंद्रिये आणि या रथात जो सारथी असतो तो सारथी म्हणजे मन.आणि या सर्वांचा स्वामी अधिकारीत असतो तो म्हणजे आत्मा. ही इंद्रिये त्या अनेक विषयांकडे धाव घेतात आणि त्यांना हाकणारा सारथी असतो ते आपलं मन. अशा वेळी आपण आपल्या स्वामीचा अर्थात आपल्या आत्म्याचा आदर नाही केला तर आयुष्यात अंध:कार खुप पसरतो.

                  मनाची शांती तेव्हाच स्थिर होते जेव्हा आपला आपल्या मनावर ताबा ठेवता येतो. बाहेर किती जरी विजा कडाडल्या, दिशा दिशांना पावसाचे फटके बसू लागले तरी आपण चार भिंतीत सुखरूप असतो. हसऱ्या चेहऱ्याने राहत असतो कारण हे संरक्षण नैसर्गिक आहे. अगदी तसच बाहेर अर्थात् आपल्या आजूबाजूला किती जरी बदल झाले काही झाले तरी जर आपल्या मनावर आपला ताबा असेल तर शांती सहजच येते कारण ती नैसर्गिक आहे. जी चिरकाल आहे फक्तं तिचा शोध सु- विचारांनी केला पाहिजे.

               तेव्हा तर नक्कीच किती संकटे, समस्या अथवा विषयी मोह न होता मनाची शांती नक्की टिकून राहील.

             

         लेखन : ओंकार जगदेव वाडकर

                  संगमेश्वर, रत्नागिरी

     भ्रमणध्वनी :  ७२१९४३२७०६ 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

If you have any questions, doubts and want to information so plz let me know..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★