★ प्रेरणादायी विचार
★ समस्या म्हणजे यातनांनी भरलेला डोह नव्हे... आपण आपल्या खऱ्या आयुष्यात पूर्ण दिवस काही ना काही करत असतो मग ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस किंवा व्यावसाय सुद्धा असू शकतो. आत्ता माणूस म्हणून जगताना काही काळ ताण यातना समस्या हे सर्व होणारच ना त्याशिवाय आयुष्य आनंदात कुणी जगत आहे अस या जगाच्या पाठीवर कुठेच घडलं नाहीय. हरकत नाही कुणी यातून बाहेर येतं तर कुणी येऊ पाहत पण कालांतराने तो बाहेर येतो. पण, काही असे ही असतात की फक्तं ही समस्या अशी आहे ते तसं आह येवढं करतात आणि तिथेच दाबून राहतात. आपण शालेय जीवनात अभ्यास केला आनंद व्यक्त केला बागडलो म्हणजे ते खरं आयुष्य असल्यासारखं वाटतं आणि ते खर आहे पण आत्ताला ते घडण ही अशक्य आहे. अर्थात काय वेळ काय सांगते माझ्यासमवेत पुढे चल नक्कीच मोठा होशील. लहापणापासूनच वाटायचं मोठा झालो की हे करेन ते करेन पण आत्ता त्यासाठी फारस नाही पण थोडफार अवघडल्यासारखं वाटतं. यात ही मोठा फरक आहे की लहानपणी एक ताकद एक ऊर्जा होती की मोठे पणी हे करायचं. आणि आज त्य...